आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीची पहिली यादी जाहीर.. सातार्‍यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, पार्थ पवार यांचे नाव नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 10 उमेदवारांचा समावेश आहे. सातार्‍यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही.

जयंत पाटील यांनी सांगितले की, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षाला देण्यात अाली आहे. पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणा आहे.  मात्र, माढा, मावळ, नगर, बीड आणि गोंदियामधून कोणाला उमेदवारी मिळेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पहिल्या यादीत हे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार

> रायगड - सुनील तटकरे

> बारामती - सुप्रीया सुळे

> सातारा - उदयनराजे भोसले

> कोल्हापूर - धनंजय महाडीक

> बुलढाणा - राजेंद्र शिंगणे

> परभणी - राजेश विटेकर

> जळगाव - गुलाबराव देवकर

> ठाणे - आनंद परांजपे

> मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील

> कल्याण- बाबाजी पाटील

बातम्या आणखी आहेत...