आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्‍ये जबाबदार सरकार देण्‍याचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आश्‍वासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळः राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि मणिपूर पीपल्‍स पार्टीने मणिपूरमध्‍ये सुशासनाचे आश्‍वासन मतदारांना दिले आहे. दोन्‍ही पक्षांनी त्‍यांचा जाहीरनामा प्रकाशित केला.
मणिपूरची प्रादेशिक एकात्‍मता हा निवडणुकीदरम्‍यान महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. ही एकात्‍मता टीकवून ठेवण्‍याचे आश्‍वासन दोन्‍ही पक्षांनी दिले आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि माजी लोकसभा अध्‍यक्ष पी. ए. संगमा यांनी सांगितले की, राज्‍यात एक जबाबदार सरकार देण्‍यास आमचे प्राधान्‍य राहणार आहे. मणिपूरमध्‍ये कोणत्‍याही एका पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत मिळण्‍याची शक्‍यता कमीच आहे, असेही संगमा म्‍हणाले. प्रदेशात शांतता प्रस्‍थापित करणे, भ्रष्‍टाचार रोखणे हेदेखील महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रादेशिक वाद मिटविण्‍यासाठी चर्चेद्वारेच मार्ग काढता येईल, त्‍यामुळे राज्‍यात असे वातावरण निर्माण करण्‍यावर भर राहील, जेणेकरुन सैन्‍य विशेषाधिकार कायदा लागू करण्‍याची गरजच राहणार नाही, असे संगमा म्‍हणाले.
मणिपूरच्‍या निवडणुकीसाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि मणिपूर पीपल्‍स पार्टी यांनी आघाडी केली असून पीपल्‍स डेमोक्रॅटीक फ्रंटची स्‍थापना केली आहे.