Maharashtra Politics / राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली नवी शक्कल, पक्षाशी एकनिष्ठ राहण्यासाठी कार्यकर्त्यांना दिली शपथ


राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात युवा कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित केला होता

दिव्य मराठी

Aug 01,2019 05:25:34 PM IST

पुणे - अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्षाला सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीला शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, विजयसिंह मोहिते पाटील अशा एकापेक्षा एक मोठ्या नेत्यांच्या रुपाने धक्के बसले आहेत. त्यामुळे पुण्यात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शपथ देऊन पक्षासोबत एकनिष्ठ राहाण्याचे आवाहन करण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात युवा कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित केला होता. यावेळी नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार प्रवक्ते अंकुश काकडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाशी आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहण्यासाठी शपथ देण्यात आली. याबाबत अमोल कोल्हेना विचारणा केली असता, ही कार्यकर्त्यांची भावना होती. असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शपथा देऊन कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्यास सांगायची वेळ आल्याने राष्ट्रवादीची दयनीय अवस्था समोर आली आहे.

X