आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुण आणि महिलांना देणार संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - १०० दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून शनिवारी मुंबईत अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तीन सत्रांत राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे काही गड तयार झाले असून तेथून उमेदवार निवडून येईलच, असे नाही. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना विशेषतः तरुण आणि महिलांना निवडणुकीत प्राधान्य दिले जावे, असे आदेश पक्षाला दिल्याचे समजते. लोकसभा निवडणूक काळात ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी याबाबत सूतोवाच केले होते आणि ‘दिव्य मराठी’नेच हे वृत्त सर्वप्रथम दिले होते.


मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील सदस्यांची एक बैठक घेतली आणि त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्य बैठक सुरू झाली. पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे नेत्यांसमोर मांडल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. तिसऱ्या सत्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांबरोबर बैठक घेण्यात आली. 


काँग्रेससाेबत आताच जागावाटपाची चर्चा नाही
जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे निश्चित झाले असून जागावाटपाबाबत काहीही चर्चा झालेली नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतही चर्चा झाली नाही. शरद पवार यांनी आदेश दिल्याप्रमाणे  या निवडणुकीत महिला आणि तरुणांना जास्त संधी दिली जाणार आहे.