आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा होईल, नंतर शिवसेनेबाबतची भूमिका स्पष्ट करू'- अहमद पटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  मुंबईत काँग्रेसच्या दिल्लीतील जेष्ठ नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील राजकीय गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल हे आज दिल्लीवरुन मुंबईत आले होते. या नेत्यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत शरद पवार, अहमद पटेल, खरगे वेणुगोपाल,अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पेटल यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते यावेळी उपस्थित होते.



पत्रकार परिषदेच्या सुरुवातील प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "दोन्ही पक्षाच्या नेत्यांना चर्चा झालीये. त्यातून एक संयुक्त पत्रक बनवले आहे. शिवसेनेने काल आमच्याशी अधिकृत संपर्क केला. कोणत्याही निर्णयापूर्वी आमची बैठक होणे गरजेचे होते. दोन्ही पक्षांची निवडणुकीत आघाडी झालेली आहे, शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत व्यापक चर्चा झाली, दोघांच्या सहमतीनंतर निर्णय घेऊ. त्याआधी दोन मित्रपक्षांशी चर्चा मगच शिवसेनेशी चर्चा ही आमची भूमिका स्पष्ट आहे", असे पटेल म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीचा निषेध करतो- अहमद पटेल
 
यावेळी बोलताना अहमद पटेल म्हणाले की, "ज्याप्रकारे राष्ट्रपती राजवटीची राज्यपाल आणि केंद्र सरकारने शिफारस आणि अंमलबजावणी केली त्याचा मी निषेध करतो. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट कशी लावावी याबाबत काही नियम बनवले आहेत. मात्र, मागील काही काळात या सरकारने अनेक राज्यांमध्ये या नियमांचे उल्लंघन करत राष्ट्रपती राजवट लावली. महाराष्ट्रात सर्व मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेबाबत विचारणा करणं अपेक्षित होतं. मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला विचारणा न करताच राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. सोनिया गांधींनी देखील या महत्त्वाच्या विषयावर स्पष्टता येण्यासाठी चर्चा आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. शिवसेनेने कालच आमच्याशी पहिल्यादा संपर्क केला. त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणे, सामाईक धोरण ठरवणे बाकी आहे. त्यामुळे याची स्पष्टता आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय होईल. आधी सहकारी पक्षाशी चर्चा केली जाईन मगच शिवसेनेशी चर्चा केली जाईल", असे अहमद पटेलांनी सांगितलं.



यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस-राष्ट्रवादीचा निवडणुकीत एकच जाहीरनामा होता. त्यामुळे आम्ही काय करायचं यावर सहमत आहोत, किमान समान कार्यक्रमावर चर्चा नाही. आधी आम्ही सहकारी पक्षांशी चर्चा करुनच शिवसेनेशी संपर्क करू. राज्यपालांनी आम्हांला भरपूर वेळ दिला आहे, आम्ही निवांत निर्णय घेऊ", असे शरद पवार म्हणाले.