आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना राष्ट्रवादीकडून प्रत्येकी १ लाखाची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपळूण (रत्नागिरी) - तिवरे धरण फुटून मृत झालेल्यांच्या कुटुुंबीयांना राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. शिवाय,  राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. 


चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला पवार यांनी सोमवारी भेट देत मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, गावापासून दूर पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी शरद पवारांकडे केली. तिवरे धरण फुटल्याने २० जणांचा मृत्यू तर ४ बेपत्ता आहेत. धरण फुटीनंतर धरणाचे ठेकेदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात आली होती. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.