Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | NCP has set up an army of experienced leaders

राष्ट्रवादीने उभी केली अनुभवी नेत्यांची फौज; जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र फाळके तर कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 12:24 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेंद

 • NCP has set up an army of experienced leaders

  नगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे यांची निवड झाली आहे. 'दिव्य मराठी'ने दोन दिवसांपूर्वीच पॉलिट्रिक्स सदरात नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबतचे भाकीत केले होते. आगामीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अनुभवी नेत्यांची फौज उभा करून मोर्चेबांधणीची रणनिती आखली आहे.


  माजी आमदार घुले यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता राष्ट्रवादीसह इतर पक्षांमध्येही होती. त्यानुसार इच्छुकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेशपातळीवर फिल्डिंग लावल्याने या पदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. कर्जतचे राजेंद्र फाळके, जामखेडचे राजेंद्र कोठारी, पारनेरचे सुजित झावरे, पाथर्डीचे प्रताप ढाकणे व कोपरगावचे संदीप वर्पे यांनी देखील या पदासाठी प्रयत्न केले. या पदासाठी चुरस निर्माण झाल्याने ही निवड लांबणीवर पडल्याचे िचत्र गेल्या काही दिवस पहायला मिळाले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्याची निकड ओळखून प्रदेशपातळीवरून निर्णय घेण्यात आला.


  जिल्हाध्यक्षपदी फाळके यांची तर कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे यांची वर्णी लागली आहे. फाळके हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी यापूर्वी कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघातून नशिब अाजमावलेले आहे. तसेच वर्पे यांनी देखील प्रदेश प्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळलेली आहे. राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकून टाकण्याचे आव्हान आता जिल्हाध्यक्षांसह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.


  जिल्ह्यात राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी अनुभवी नेत्यांची फौज उभी करण्याचा प्रयत्न नवीन पदाधिकारी निवडीतून दिसून आला आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचीही धुरा सांभाळलेली आहे आता त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी घेण्यात आली. त्यापाठोपाठ प्रदेश सरचिटणीसपदी अविनाश आदिक, शहराची धुरा सांभाळणारे अंबादास गारुडकर यांच्यावर चिटणीसपदाची जबादारी सोपवली आहे. या निवडीबरोबरच जिल्हाभरात मतदारसंघनिहाय दौऱ्याचे नियोजन आखून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा पक्षाचा मानस आहे.


  पवार यांचा दौरा रद्द
  राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (२४ ऑगस्ट) जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. परंतु, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयाने दिली आहे.


  नवीन पदाधिकारी
  जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग, प्रदेश सरचिटणीस पदावर अविनाश आदिक, प्रदेश चिटणीसपदी अंबादास गारुडकर यांची निवड झाली आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

Trending