आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..सुप्रिया सुळे यांचा दस्तऐवज क्रमांक वापरून दीपक मानकरांकडून फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिती अधिकारात आले उघडकीस

पुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर आणि त्यांची सहकारी साधना वर्तक यांनी अदिती माधव दीक्षित व मेधा प्रभाकर दीक्षित यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र 5463/2003 व 5614/2003 दस्तऐवज बनवून शिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक 529 वरील 20 हजार चौरस फूट जागा आपल्या ताब्यात असल्याचे भासवले. त्याआधारे रास्ता पेठ येथील मुकुंद दीक्षित यांच्याकडून 50 हजार चौरस फूट जागा दीड कोटी रुपयांना विकत घेऊन त्या जागेच्या बदल्यात शिवाजीनगर येथील जागा देणार असल्याचे सांगितले. तसेच 45 लाख 90 हजार रुपये कमी करावे, असे सांगत व्यवहार केला. मात्र, प्रत्यक्षात शिवाजीनगर येथील कुलमुखत्यारपत्राचे दस्त क्रमांक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पंचशील टेक पार्कचे उद्योजक अतुल चोरडिया, उद्योजक अरुण फिरादिया यांच्या नावे नोंद असल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस अाल्याचे आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

बऱ्हाटे म्हणाले, मानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावे नोंद असलेल्या दस्ताचा क्रमांक वापरून बनावट व बोगस दस्त नोंद केले. याबाबत शासनाने दखल घेऊन गुन्हा नोंद करावा, अशी आमची मागणी आहे. 481 रास्ता पेठेतील मिळकत सांभाळण्याच्या वादातूनच मानकर यांचा कार्यकर्ता जितेंद्र जगताप याने आत्महत्या केली असून त्याप्रकरणी मानकर सध्या कारागृहात आहे. संबंधित मिळकत ही मानकर यांनी मुकुंद परशुराम दीक्षित यांच्याकडून दीड कोटी रुपयांना विकत घेतल्याचा करारनामा लिहून घेतल्याचे बऱ्हाटे म्हणाले.

 

एकाकी महिलांची मानकरकडून फसवणूक  
बऱ्हाटे म्हणाले, अदिती व मेधा दीक्षित यांना मूलबाळ नसून त्या एकट्या राहतात. त्यांच्या असहायतेचा फायदा घेत मानकर व वर्तक यांनी अदिती दीक्षित यांच्या शिवाजीनगर, पिंपरी वाघिरे, साधू वासवानी रोड पुणे येथील मिळकती विविध दस्तान्वये विक्री करून आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत कोथरूड व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात मानकर, वर्तक, उमेश कोठावडे, मुकुंद दीक्षित व इतरांविरोधात गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी याबाबत तपास केला असता त्यांनी अदिती दीक्षित यांनी मानकर व वर्तक यांना कोणतेही दस्त लिहून दिले नसल्याचे सांगितले. बिबवेवाडी येथील सहदुय्यम निबंधक हवेली यांच्याकडे अर्ज करून दस्त क्र. 5463/2003 बाबत माहिती मिळवली असता ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या मे. सुप्रिया होडिंग प्रा. लि यांच्या मालकीची सर्व्हे नं. 11 क्षेत्र 2,11,000 चौ. फूट, औंध येथील मिळकत रोहन डेव्हलपर्स यांनी विकसित करून रोहन मिलय नावाने प्रकल्प बांधल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...