आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच, गुप्त मतदानाला का भीता, हिम्मत असेल तर गुप्त मतदान होऊ द्या, असे आव्हानही महिविकास आघाडीला दिले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले की, "खुले मतदान हे नियमाला धरूनच आहे. यात कुठेही नियमभंग नाही. भाजपकडूनच फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी धमक्या देऊ नयेत. उलट त्यांनीच आमचं खुल्या मतदानाचं आव्हान स्वीकारावं."
ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला. त्यावरही नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे. शपथविधी हा शपथविधी असतो. चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल. असेही नवाब मलिक म्हणाले.
"भाजप दावा करत आहे की, 119 आमदार त्यांच्याकडे आहेत. स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष. मात्र आज तशी परिस्थिती नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचे भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावे. भाजपने प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी", असेही नवाब मलिक म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.