आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली, शिवसेनेवरील गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून सारवासारव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार स्थापित करत असताना आम्ही शिवसेनेकडून काहीही लिहून घेतले नाही -राष्ट्रवादी

मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केलेल्या वक्त्याची राष्ट्रवादीकडून सारवासारव केली जात आहे. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली. सोबतच, राज्यात सरकार स्थापित करत असताना आम्ही शिवसेनेकडून काहीही लिहून घेतले नाही. असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची स्थापना किमान समान कार्यक्रम ठरल्यानंतरच झाली आहे. या कार्यक्रमावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संमती दर्शवली तसेच सह्या देखील केल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले होते, की सरकार स्थापन करताना शिवसेनेकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे. काँग्रेस आणि सोनिया गांधी शिवसेनेसोबत सत्ता स्थापित करण्यासाठी तयार नव्हते. परंतु, शिवसेने राज्यघचटनेच्या चौकटीत राहूनच काम करण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यानंतरच आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला. शिवसेना घटनेच्या विरोधात काम करत असेल तर सरकारमधून बाहेर पडू असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. याच मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.