Flood Victims / कोल्हापूरात शरद पवारांनी पुरग्रस्तांसह साजरा केला स्वातंत्र्य दिन... पुरग्रस्तांनी शरद पवारांना राखी बांधून आस्था आणि आपुलकी व्यक्त केली...

कोल्हापूरात स्वातंत्र्यदिन साजरा करून पवार म्हणाले, आपण एकत्र संकटाला तोंड देऊ

प्रतिनिधी

Aug 15,2019 12:35:00 PM IST

कोल्हापूर - राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला आहे. आज संकट मोठं आहे आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना दिला. देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसोबत साजरा केला. तसेच पीडितांची विचारपूस केली. यावेळी स्थानिक महिलांनी शरद पवारांना राखी देखील बांधली.


महापुराचा मोठा फटका कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना बसला आहे. आज मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबातील भगिनी व बांधवांसह आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. झेंडावंदन जेथे झाले त्या मैदानातील उपस्थित भगिनींनी शरद पवार यांना राखी बांधून आपली आस्था आणि आपुलकी व्यक्त केली. एवढंच नाही तर आसपासच्या लोकांनी यथाशक्ती येथे मदतही दिली.

X
COMMENT