आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती पैलवानांशी होते 'अशांशी' नाही, हाताने आक्षेपार्ह इशारा करत शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप सोपाल यांच्या प्रचारार्थ बार्शी येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी निशाणा साधला. 'कुस्ती पैलवानांशी होते 'अशांशी' नाही' असे ते यावेळी म्हणाले. येथे 'अशांशी'चा अर्थ हा अप्रत्यक्षपणे तृतीयपंथीशी होता. यादरम्यान शरद पवार यांनी आपल्या हाताने आक्षेपार्ह इशारा देखील केला. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मागील एका सभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले होते की 'आम्ही आमचे पैलवान तेल लावून मैदानात उतरले आहेत. पण समोरचे लोक मैदानात उतरायला तयारच नाहीत. ते मैदान सोडून पळून जात आहेत.' मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला उत्तर देत शरद पवार म्हणाले की, ''कु्स्ती ही पैलवानांशी होते 'अशांशी' नाही.'' येथे अशांशी म्हणताना पवारांनी आक्षेपार्ह हातवारे केले. 


पवारांचे संतुलन बिघडले, भीतीपोटी असे विधान करत आहेत - भा
जप
शरद पवारांच्या या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते मधु चव्हाण म्हणाले की, 'अनेक वर्षांपासून राजकारणात असलेल्यांच्या मुखातून असे विधान शोभत नाही. त्यांचे संतुलन अगोदरच बिघडले आहे. आता ते भीतीपोटी असे विधान करत आहेत.''

बातम्या आणखी आहेत...