आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपने मिळून सरकारची स्थापना करावी, आम्ही जबाबदार विरोधीपक्ष म्हणून काम करू -पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राउत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव घेऊन आले नव्हते -शरद पवार
  • विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार असल्याचा शरद पवारांचा पुनरुच्चार

मुंबई - राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला सत्तेसाठी कौल दिला. त्यामुळे, त्यांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर सत्ता स्थापित करावी असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत असे पवारांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू -शरद पवार


दरम्यान, सर्वांच्या नजरा लागलेल्या महाराष्ट्र सरकार स्थापनेवर शरद पवारांनी मोठे विधान केले. यावेळी बोलताना, आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू असे पवार म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, अवघ्या काही मिनिटांपूर्वी शिवसेना नेते संजय राउत यांनी शरद पवारांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतरही पवारांनी आपला निर्णय बदललेला नाही. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असे स्पष्ट केले होते. त्याचाच पवारांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत पुनरुच्चार केला.

संजय राउत यांनी कुठलाही प्रस्ताव दिला नाही

शरद पवार यांनी संजय राउत यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. संजय राउत बुधवारी सकाळी भेटीसाठी आले, त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिला नाही. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपला सत्तेसाठी कौल दिला. आता शिवसेना आणि भाजपने मिळूनच सरकार स्थापित करावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार आहोत आणि सरकार स्थापनेत कुठलाही रस नसल्याचे यावेळी पवारांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील शेतकरी, दिल्लीतील शेतकऱ्यांचीही चिंता


यावेळी बोलताना पवारांनी दिल्ली पोलिसांच्या आंदोलनासह महाराष्ट्रात ओल्या दुष्काळातील संकटग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सर्वच राज्यांमध्ये पोलिसांची परिस्थिती वाइट आहे. पण, दिल्लीत पोलिसांना आठवड्याची सुटी देखील मिळत नाही. वकिलांनीही सबुरीने घ्यावे. या समस्यांवर लक्ष देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही असे पवार म्हणाले. सोबतच, शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाली. यासाठी सरकारने तातडीने विमा कंपन्यांची बैठक घेऊन आदेश द्यावे असेही पवार यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...