आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन पाटलांना सुप्रिया सुळेंचे आव्हान, राहुल गांधींसोबत कधी मीटिंग झाली ते जाहीर करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रदेशाध्यक्ष पद देऊन, मंत्री करून राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला ते सांगा? असा सवाल पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यानी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीला जिल्हा परिषदेच सदस्यत्व मिळाव यासाठी त्यांच्या  विनंतीवरून राष्ट्रवादीने मीटिंग रद्द केली याची आठवण करून देत, राहुल गांधींसोबत आपली मीटिंग कधी झाली ते जाहीर करा असे खुले आव्हान त्यानी पाटील याना दिले आहे. भास्कर जाधव आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराबाबत त्या 'दिव्य मराठी'शी बोलत होत्या.

इंदापूरच्या जागेचा विषय जागा वाटपाच्या चर्चेला येण्यापुर्वीच हर्षवर्धन पाटील यानी हे पाऊल उचलण अत्यंत दुखद असल्याचे मत सुळे यानी व्यक्त केले. 'त्यांच्या उमेदवारीला कुणीच नाही म्हणाल नव्हत, तरी त्यानी एकतर्फी निर्णय घेतला.  मी हे बोलणार नव्हते पण आज त्यानीच बोलण्याची वेळ आणली. मागच्या आठवड्यात यांच्या मुलीला जिल्हा परिषदेच सदस्यत्व मिळव म्हणून कॉंग्रेस मध्ये अंतर्गत वाद असताना त्यांचा फोन आला म्हणून आम्ही मीटिंग रद्द केली. आणि आज हे काहीही आरोप करीत आहेत त्याचे वाईट वाटते,' असे त्या म्हणाल्या.  त्यांची बाजू खरी होती मग ते 48 तास नॉट रिचेबल का होते, मोबाइल बंद ठेवण्या सारखं काय झालं होतं, असा प्रश्न त्यानी पाटील यांच्या पक्षांतराच्या निमीत्ताने उपस्थित केला आहे.


'राहूल गांधी, सुप्रिया सुळे आणि आपली मीटिंग झाल्याचे हर्षवर्धन पाटील सांगत आहेत, ती मीटिंग कधी आणि कुठे झाली हे त्यानी जाहीर कराव, अन्यथा मी इंदापूर मध्ये जाऊन हे सांगणारच आहे',  असे सुळे म्हणाल्या. पक्ष सोडून जाणार्यानी त्यांच्यावर काय अन्याय झाला हे जाहीर कराव असं आव्हान त्यानी भास्कर जाधव यानाही दिलं.

बातम्या आणखी आहेत...