आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत. यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीतील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत चर्चा सुरू झाली, ती निवडणुकीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सची. कोअर कमिटीतील सगळेच नेते बैठकीत सोशल मीडियातील किस्से ऐकवतानाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. 'पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरं झालं.' पासून ते टिक-टॉकवर सुरू झालेल्या मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन या वाक्यावरून सोशल मीडियावर उडवली जाणारी खिल्ली इथपर्यंत चर्चा काही काळ बैठकीत रंगली होती.
बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, आमदार धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य हजर होते. या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपाकडून करण्यात आलेला प्रचार आणि निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स, विनोद, कवितांवर चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे सर्वच नेते आपल्याकडील सोशल मीडियातील किस्से रंगवून सांगताना या व्हिडीओत दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.