आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड, उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. शनिवारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.महाविकास आघाडीची उद्या अग्निपरीक्षा


राज्यपालांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. आता राज्यपालांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे. शनिवारी उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. उद्या या महाराष्ट्र आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...