Home | Maharashtra | Mumbai | NCP MLA Jitendra Awhad has attended Dahihandi festival of MNS

ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है : जितेंद्र अाव्हाड

दिव्य मराठी | Update - Sep 04, 2018, 06:40 AM IST

ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावून सर्वांना अाश्चर्याचा धक्का दिला

  • NCP MLA Jitendra Awhad has attended Dahihandi festival of MNS

    मुंबई- ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावून सर्वांना अाश्चर्याचा धक्का दिला. “ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है’ असे जाहीर वक्तव्यही करत त्यांनी नव्या राजकीय समीकरणाची ‘हंडी’ फाेडण्याचा प्रयत्न केला.


    ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अायाेजित केलेल्या दहीहंडी उत्सवात दहा थर लावणाऱ्या मंडळाला २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तीन महिन्यापूर्वी आव्हाड हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील कृष्णकुंज निवासस्थानी गेले होते, तेव्हाही राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या होत्या. अाता दहीहंडीच्या व्यासपीठावरून आव्हाड यांच्या वक्तव्याने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ‘काहीतरी शिजतंय’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली अाहे. गेले काही महिने राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टीका करत अाहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वच माेदीविराेधकांची माेट बांधण्यासाठी अापण पुढाकार घेणार असल्याचे सूताेवाच केले अाहे.

Trending