आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरहरी झिरवाळ हे शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत

मुंबई- शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. 

शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाकडूनही अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र त्यांच्याकडून आज अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.


या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आदींसह  महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अभिनंदन केले आहे.


नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे.

बातम्या आणखी आहेत...