आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार विद्या चव्हाण - Divya Marathi
आमदार विद्या चव्हाण
  • मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टापायी केला सुनेचा छळ
  • चव्हाण कुटुंबीयांविरोधात सुनेेने १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती

मुंबई - मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टापायी सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण व कुटुंबीयांविरोधात विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे आरोप निखालस खोटे असून आपल्या सुनेचे चार जणांशी विवाहबाह्य संबंध आहेत.


आपल्यावरील आरोपांवर बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्यी की, "माझी सून माझ्याविरोधात तक्रार का करते, हा माझ्यासमोरही प्रश्न आहे. माझा मुलगा इंजिनिअर आहे. मुलगा अजित दहा डिसेंबरला त्याची पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलीसोबत डेन्मार्कला जाणार होता. काही दिवसांपूर्वी सूनेचा मोबाईल बिघडला, तेव्हा तिने माझ्या मुलाला तपासण्यास सांगितले होते. त्यावेळी तिचे व्हॉट्सअॅप चॅट मुलाच्या नजरेस पडले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने माझ्या मुलालाही मोठा धक्का बसला" असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.