आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोडा-फोडीसाठी भाजपची हॉटेलात घुसखोरी! राष्ट्रवादीच्या आमदारांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र सरकार स्थापनेवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अवघ्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादीने आपल्या आमदारांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि अजित पवारांच्या पाठिंब्याने नवीन सरकारचा शपथविधी शनिवारी झाला. तेव्हापासूनच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार तीन वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अचानक आपल्या आमदारांचे हॉटेल रिनेसॉ येथून आता हयातमध्ये स्थलांतर केले आहे.

आमदार फोडण्यासाठी रूम बुक करतेय भाजप -काँग्रेस

काँग्रेस नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, भाजपचे नेते काँग्रेसच्या आमदारांना संपर्क साधण्याचे प्रयत्न करत आहेत. काही नेत्यांनी तर चक्क त्याच हॉटेलमध्ये रुम देखील बुक केले आहेत. ज्या ठिकाणी आमदारांना एकत्रितरित्या ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी भाजपचे नेते खोल्या बुक करत आहेत. तरीही काँग्रेसच्या आमदारांची एकजूट आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काहीच परिणाम होणार नाही असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...