आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस नव्हे फसवणूक सरकार..जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सुप्रीया सुळे यांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवरायाच्या नावाने केली. पती-पत्नीला ऑनलाईन उभे केले मात्र, कोणाची कर्ज माफी झाली, हे तर फडणवीस नव्हे फसवणूक सरकार असल्याचा घणाघाती आरोप खासदार सुप्रीया सुळे यांनी सिंदखेडराजा येथील नगरपरीषदेच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात केला.

 

नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ.ए,पी.जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे व जिजामाता राजवाड्या समोरील खुल्या प्रांगणातील व्यामशाळेचे उद्‍घाटन सुप्रीया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सावीत्रीबाई फुले व जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या जाहिरातीसाठी 500 कोटी खर्च केले
सुप्रीया सुळे म्हणाल्या, या सरकारच्या काळात बेरोजगारी महागाई वाढली आहे. जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या जाहिरातीसाठी 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी शब्द दिलेले 311 कोटी रूपये अद्याप दिले नाही. नुसत्या घोषणा देण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जिजाऊ जन्मस्थळ आदी वीविध महापुरूषांच्या ऐतिहासिक स्थळी  विकासाच्या नावाने घोषणा करण्याचेच काम हे सरकार करत आहे.

 

जिथे भाजपाची सत्ता आहे तिथेच हे सरकार निधी देते, असा टोला डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी लगायला. आपल्या राष्ट्रवादीच्या सतेतील स्थानिक स्वराज्य संस्थाना नीधी न देता दुजाभाव करत असल्याचे ते म्हणाले. तर आमदार राजेश टोपे यांनी सराकारवर घणाघाती आरोप करत आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रास्तविकातून नगराध्याक्ष नाझेर काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवराच्या हस्ते दहा दिवस झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजिम नवाझ राही यांनी केले. कार्यक्रमाला उपाध्याक्ष सीमा शेवाळे, मुख्याधिकारी एच.डी.वीर यांच्यासह सर्व नगरपालिका सदस्य उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...