आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेल्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे तिसर्‍या तर उदयनराजे पाचव्या स्थानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या खासदारांपैकी संपत्तीत सर्वाधिक वाढ जाहीर करणार्‍या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या तिसर्‍या तर सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे पाचव्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१ कोटींवरून (२००९) २०१४ मध्ये ११३ कोटींवर पोहोचली असून संपत्तीतील ही वाढ १२१ टक्के आहे. तर उदयनराजेंच्या संपत्तीत ११ कोटींवरून (२००९) ६० कोटींची (२०१४) म्हणजेच ४१७ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

 

नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून ही माहिती सादर केली आहे. या १५३ खासदारांमध्ये महाराष्ट्रातील १५ खासदारांचा समावेश आहे.

 

२००९ ते २०१४ दरम्यानच्या पाच वर्षात देशातील १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाखांची वाढ झाली आहे. संपत्तीतील सर्वाधिक वाढ जाहीर करणार्‍या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे आणि छत्रपती उदयनराजे हे अनुक्रमे तिसऱ््या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) हे या यादीत विसाव्या क्रमांकावर असून त्यांनी संपत्तीत २ कोटीवरून (२००९) २०१४ मध्ये १८ कोटी संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्या संपत्तीतील वाढ ही ६६० टक्के आहे.

 

यादीतील अन्य खासदारांची सांपत्तिक स्थिती अशी :

२५ : अढळराव पाटील (शिरूर, शिवसेना) २००९ -१२ कोटी, २०१४-२५ कोटी, १०० टक्के वाढ
२७ : ए.टी. पाटील (जळगाव, भाजप)२००९-१०कोटी, २०१४-२२ कोटी, ११८ टक्के वाढ.
३७: चंद्रकांत खैरे (शिवसेना, औरंगाबाद) २००९-१ कोटी, २०१४-९ कोटी, ५४० टक्के वाढ.
४५ : दिलीप गांधी (भाजप, नगर) २००९-१ कोटी, २०१४-६ कोटी, ४०० टक्के वाढ.
५६ : अनंत गिते (रायगड, शिवसेना) २००९-८५ लाख, २०१४-४ कोटी, ४२० टक्के वाढ.
५८:  भावना गवळी (यवतमाळ-वाशिम, शिवसेना), २००९-३ कोटी, २०१४-६ कोटी, १०० टक्के वाढ.
६३ : संजय धोत्रे (अकोला, भाजप), २००९-१ कोटी, २०१४-४ कोटी, १५१ टक्के वाढ
६४ : हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी, भाजप) २००९-८५ लाख, २०१४-३ कोटी, ३३७ टक्के वाढ
७२ : प्रतापराव जाधव (बुलडाणा, शिवसेना) २००९-१, २०१४-३ कोटी, १९९ टक्के वाढ
९३ :आनंदराव अडसूळ (अमरावती, शिवसेना), २००९-१ कोटी, २०१४-३ कोटी, ८४ टक्के वाढ
१२२ : राजू शेट्टी (हातकणंगले, शेस्वाप) २००९-२२ लाख २०१४ -९८ लाख, ३३९ टक्के वाढ
१२३ : हंसराज अहीर (चंद्रपूर, भाजप) २००९-८० लाख, २०१४-१ कोटी, ९२ टक्के वाढ

बातम्या आणखी आहेत...