आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाजप सरकार समाजात विभाजन करतेय', राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : समाजासमाजात विभाजन करण्याचे काम आजचे भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुंबईत व्यक्त केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात अल्पसंख्याक सेलची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी शरद पवार बोलत होते. आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी या बैठकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती- धर्मांतील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत, परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन उपस्थितांना केले.

युवकांना रोजगार देण्याचे काम आपले आहे. त्यांच्यासाठी काम करायचे आहे, असा विश्वास पजलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. बैठकीत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शब्बीर विद्रोही, माजिद मेमन, गफार मलिक यांनीही आपले विचार मांडले. खा. सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदी उपस्थित होते.

व्हीजेेएनटी लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही

एनआरसी, सीएएमुळे मुस्लिम समाजाला दुर्लक्षित केले जात आहे, तर दुसरीकडे एका जागेवर न राहणाऱ्या व्हीजेेएनटीच्या लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यांनाही त्यांचा पुरावा द्यावा लागण्याची वेळ या भाजपने आणली आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.
 

बातम्या आणखी आहेत...