आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NCP President Sharad Pawar Meets Sonia Gandhi, Discusses Situation In Maharashtra

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट, महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा गुंता सुटत नाहीये. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सोबत होते. या भेटीसंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी सोनिया गांधींना माहिती देण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली. शिवसेना सातत्याने सामनातून भाजपविषयी लिहीत आहे. आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे."
"राज्यातील सरकार स्थापनेच्या दृष्टीने ही चर्चा केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली आहे. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सरकार बनवण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ नाहीये. लवकरच पुढील निर्णय स्पष्टर करू." असेही पवारांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचीही सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले होते.