आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने काल, गुरूवारी पहिली यादी जाहीर केली होती. मावळमधून अखेर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जयंत पाटील यांनी सांगितले की, काही मतदार संघाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
शिरुरमधून अमोल कोल्हे तर नाशकातून समीर भुजबळ
राष्ट्रवादीने नुकताच पक्षप्रवेश केलेले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अशी आहे राष्ट्रवादीची दुसरी यादी..
- मावळ- पार्थ पवार
- शिरुर- अमोल कोल्हे
- नाशिक- समीर भुजबळ
- बीड- बजरंग सोनवणे
- दिंडोरी- धनराज महाले
अशी आहे राष्ट्रवादीची पहिली यादी
- बारामती- सुप्रिया सुळे
- सातारा- उदयनराजे भोसले
- ठाणे- आनंद परांजपे
- जळगाव- गुलाबराव देवकर
- बुलढाणा- राजेंद्र शिंगणे
- परभणी- राजेश विटेकर
- उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील
- कल्याण- बाबाजी पाटील
- कोल्हापूर- धनंजय महाडिक
- लक्षद्विप- मोहम्मद फैझल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.