आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान केंद्र आणि EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या 3 किमी परिसरातील इंटरनेट सेवा बंद करावी, राष्ट्रवादीची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मतदान केंद्र आणि EVM स्ट्राँग रुमजवळील 3 किलोमीटर अंतरातील इंटरनेट सेवा मतमोजणी होईपर्यंत बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज(रविवार) निवडणूक आयोगाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघांसाठीचे मतदान उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरला होणार आहे, तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होईल.


राष्ट्रवादीने मुख्य निवडणुक अधिकाऱ्याला पत्र लिहीले आहे. त्यात असे लिहीले की, "ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संभाव्य हॅकिंग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवावी." राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले की, इतर राज्यांमधील निवडणुकीदरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे. त्यामुळे राज्यातही इंटरनेट सेवा बंद ठेवावी. राज्यातल एकूण 96,661 पोलिंग बुथ आहेत.याआधी धनंजय मुंडे यांनीही केली जॅमर बसवण्याची मागणी
 
''मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान मशीनसोबत मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहावी, या दृष्टीने आयोगाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत. तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा (21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर) पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...