आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अखेर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, रामराजे यांचे बंड खुद्द शरद पवार यांनीच केले थंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेचे सभापती फलटणचे रामराजे निंबाळकर व येवल्याचे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडण्याच्या मन:स्थितीत असतानाच शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांचे मन वळवल्याची चर्चा आहे. भुजबळांना शिवसेना नेत्यांचा विरोध असल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला. मात्र ते कधीही शिवसेनेत जाऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन पवार यांनी शनिवारी मुंबईत भुजबळ यांच्याशी तासभर चर्चा केली. पक्षात त्यांना आलेल्या अडचणींची त्यांनी माहिती करून घेतली आणि त्यांची समजूत काढली.

चर्चेनंतर रामराजेंनी विचार बदलला
रामराजे निंबाळकर हेही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर नाराज असून त्यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातच त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याच काळात उदयनराजेही भाजपमध्ये जात असल्याच्या बातम्या आल्याने त्यांनी सेनेकडे मोर्चा वळवला. शनिवारीच ते निर्णय जाहीर करणार होते. परंतु शरद पवार यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली.