आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफाड तालुका राष्ट्रवादीला खिंडार; तालुकाध्यक्ष अनिल कुंदेंसह अनेक कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर / मुंबई - निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सामिल झाले. त्यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवबंधन बांधले आहे. अनिल कुंदे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले तालुकाध्यक्ष अनिल कुंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. कुंदे यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठांशी याबाबत चर्चा देखील केली. त्यानंतर आगामी दिशा व राजकीय भवितव्य शिवसेनेत उज्ज्वल असल्याचे त्यांच्या लक्षात घेऊन त्यांनी सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश केला. कुंदेंसह शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये तीन नगरसेवक देवदत्त कापसे, किरण कापसे, आसिफ मणियार तसेच तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी निफाडचे नगरसेवक किरण कापसे, नगरसेवक देवदत्त कापसे, नगरसेवक अरिफभाई मनियार, यांच्यासह शिवरे येथील माजी सरपंच, व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक बबनराव सानप, चांदोरीचे सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, पिंपळस येथील राष्ट्रवादीचे शहरप्रमुख  संदिपकाका अहेर, निफाड अर्बन बॅक चेअरमन राजाभाऊ राठी, लालपाडीचे कचरु फड, निफाड वि.वि.सहकारी सोसायटी संचालक भाऊसाहेब कापसे, कृष्णाशेठ नागरे, सीताराम बागडे, सुभाष गाजरे, महेंद्र कापसे, रफिकभाई शेख, वकिलभाई शेख, सलीमभाई सय्यद, किरण कुंदे, समाधान कुभार्डे, धनजय मुंढे, अमर परदेशी, शैलेश जाधव, प्रशांत खडताळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका प्रमुख सुधीर कराड, नगरसेवक मुकुंद राजे होळकर, आनंद बिवाल, संदिप जेऊघाले, शहरप्रमुख संजय कुंदे, संजय धारराव, रतन गाजरे, बापू कापसे, रावसाहेब कुंदे, तुकाराम उगले, बाजीराव सानप, संदिप सानप, रामनाथ सानप, बाळासाहेब सानप, रावसाहेब गोहाड, दशरथ रुमणे, रंगनाथ कर्पे व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...