करमाळा / करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनाही आवाहन

तांत्रिक अडणींमुळे अर्ज मागे घेता आला नसला तरी पाठिंबा संजयमामांनाच -राष्ट्रवादी

प्रतिनिधी

Oct 09,2019 02:22:00 PM IST

मुंबई - करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आले. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही. तो अर्ज तसाच आहे. त्यामुळे, अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


तरी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचे काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस माणिकराव शिंदे यांचा शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. येवल्यात हा छगन भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

X
COMMENT