आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर बँक घाेटाळ्यात राष्ट्रवादीच्या राेहित पवारांचाही समावेश : सोमय्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (शिखर बँक) साखर कारखान्यांसाठी वाटलेल्या कर्जामध्ये हजाराे काेटींच्या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवारांसह रोहित पवारांचेही नाव असल्याचा गंभीर आराेप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार  किरीट साेमय्या यांनी नाशकात केला. नाशकातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बुद्धिजीवी घटकांच्या भेटीगाठीसाठी साेमय्या बुधवारी (दि. १६) आले असता वसंतस्मृती पक्ष कार्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

शिखर बँकेच्या कर्जवाटपाबाबत नाबर्ड, कॅग तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालात हा हजाराे काेटींचा घाेटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्याला काेट्यवधींचे कर्ज द्यायचे, त्यानंतर ताे कारखाना आजारी पाडायचा. कर्ज थकल्याने शिखर बँकेने जप्त करायचा आणि त्यानंतर देखाव्यासाठी बाेगस लिलावधारक उभे करायचे अन् अल्प किमतीत ताे कारखाना खरेदी करायचा अशी व्यूहरचना पवारांनी करत किमया साधली. या सर्व गाेष्टी चाैकशी अहवालात समाेर आलेल्या आहेत. ईडीच्या चाैकशीवरूनच शरद पवार व अजित पवार यांच्यात वाद झाल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे नाटकही केल्याची टीका त्यांनी केली. शिखर बँक घाेटाळ्याप्रमाणेच जलसिंचन घाेटाळ्याबाबत लवकरच उच्च न्यायालय गुन्हे दाखल करण्याचे आदेश देईल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ७० दिवसांच्या आत काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्याने आगामी विधानसभेत नक्कीच फायदा हाेणार असून महायुतीच्या २३३ हून अधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही साेमय्या यांनी या वेळी व्यक्त केला.
 

राज ठाकरे नेमके काय करतात तेच कळत नाही 
बंडखोरांना महायुतीचे नेते समज देतील. मात्र, बंडखोरीचा परिणाम हाेणार नाही. नाशिकमध्ये भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. पीएमसी बँक महिनाभरात पुनरुज्जीवित करण्यात येईल. मुख्यमंत्र्यानी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पक्षहितामुळे खासदारकीचे तिकीट कापले. मात्र, पक्षाने अन्य जबाबदारी देऊन विश्वास व्यक्त केला आहे.  राज ठाकरे नेमके काय करतात हेच कळत नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...