नागपूर / नक्षल भूसुरुंग स्फोटातील आरोपी निघाला राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष

स्फोटात १५ पोलिसांसह १६ जण झाले हाेते ठार
 

प्रतिनिधी

Jul 06,2019 09:53:00 AM IST

नागपूर - १ मे रोजी महाराष्ट्रदिनी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंग स्फोटात अटक झालेला संशयित कैलास प्रेमचंद रामचंदानी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली आहे. ३० एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ पोलिस शहीद तर एका चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता.

X
COMMENT