आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेडला भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या युवकांचा चाकूहल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - नगर जिल्ह्यातील बांधखडक (ता. जामखेड) येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत मारामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकूहल्ल्यात दोघे जखमी झाले. संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राेहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यात लढत हाेत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बांधखडक येथे साेमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर फुंदे (वय २२, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला झाल्याने चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवर दगडफेक केली. या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच काकासाहेब खाडे व इतर अनोळखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 

पुणे जिल्ह्यात मतदान रांगेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुणे | भाेसरी मतदारसंघात मतदानासाठी रांगेत उभे असताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अब्दुल रहीम नूरमोहंमद शेख (६०, रा. भाेसरी, पुणे) असे मृत व्यक्तीचे  नाव आहे. साेमवारी दुपारी अब्दुल शेख हे शांतीनगरातील महात्मा फुले मतदान केंद्राबाहेर ते रांगेत थांबले हाेते. त्याच वेळी अचानक त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर काेसळले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बाेगस मतदान : पाच ताब्यात
पुणे | पिंपरीतील विद्यानिकेतन शाळेत पाच परप्रांतीय तरुण बाेगस मतदान करण्यासाठी अाले हाेते. त्यांची संशयास्पद हालचाल पाहून शिवसेना अामदार गाैतम चाबुकस्वार यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणांना पकडले अाणि पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडे बनावट अाेळखपत्र हाेते.