आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कँडलफेम नारायणदत्त तिवारींनी टेकविले काँग्रेसपुढे गुडघे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायणदत्त तिवारी यांनी पुन्हा एकदा आपला जुना पक्ष काँग्रेसपुढे गुडघे टेकले आहेत. उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस त्यांनी आपला पवित्रा बदलला व काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला.
उत्तराखंडमध्ये आपल्या विलक्षण राजकीय प्रभावामुळे प्रसिद्ध व चर्चेत असलेले तिवारी यांनी काँग्रेस पक्षाकडे पुन्हा यू-टर्न घेऊन आपल्या समर्थकांच्या आशेवर घोर पाणी सोडले आहे.
तिवारी यांचे राजकीय कारकीर्द वादग्रस्त आहे. उज्ज्वला शर्मा या महिलेने त्यांच्याबरोबर आपले शारीरिक संबंध असल्याचे सांगत त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगा असल्याचे सांगितले होते. तसेच त्या मुलाचे नाव रोहित शेखर (३१) असे असून त्यानेही न्यायालयात आपले वडील एनडी तिवारी असल्याचे म्हटले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्या मुलांचे डीएनए तिवारी यांच्या डीएनएशी जुळले होते. या घटनेमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते तसेच काँग्रेसलाही उत्तराखंडमध्ये सत्ता गमवावी लागली होती. काँग्रेसने त्याचे राजकीय पुर्नवसन करताना त्यांना आंध्रपदेश राज्याचे राज्यपालपद बहाल केले होते. पण तेथेही त्यांनी रासलीला केल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनेने स्टिंग ऑपरेशन'द्वारे उघडे केले होते. या वाहिनीने तिवारींना तीन तरुणींबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आल्यानंतर 86 वर्षीय तिवारींनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसपासून दूर गेले होते.
त्यामुळे तिवारी यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी 'निरंतर विकास संपर्क समिती'ची स्थापना केली होती. तसेच राज्यातील सर्व म्हणजे ७० जागांवर विधानसभा निवडणुका लढविण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांच्या पत्राच्या ४०० लोकांनी अर्जही भरले होते.
तिवारी यांनी त्यावेळी बोलताना सांगितले की, निवडणुक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. प्रत्येक योग्य व्यक्तीला निवडणुकीद्वारे आपली प्रतिभा दाखवायची संधी दिली पाहिजे. त्यांनी असेही म्हटले होते की, या निवडणुकीत पक्षांची भूमिका इतकी महत्त्वाचे नाही तितकी योग्य उमेदवारांची आहे.
निरंतर विकास संपर्क समितीचे प्रमुख सेवानिवृत्त मेजर भारत शर्मा यांनी बोलताना सांगितले की, तिवारी यांनी अंतिमक्षणी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाच्याबरोबर जवळच्या तीन नातेवाईकांना तिकीट मिळवून दिले आहे. त्यामुळे समितीने निवडणुकीतून अंग काढून घेतले आहे.
शर्मा यांनी सांगितले की, तिवारी यांनी यू-टर्न घेतल्यामुळे त्यांच्या समर्थकांचे राजकीय भविष्य संपल्यातच जमा आहे. त्यांच्या समर्थकांनी मागील काही वर्षे चांगली मेहनत घेतली होती. ज्यावर तिवारी यांनीच पाणी फिरवले आहे. जे काही झाले ते नक्कीच चांगले झाले नाही. त्यांच्या समर्थकांत घोर निराशा पसरली आहे. तिवारी यांनी काँग्रेस पक्षापुढेच गुडघे टेकले तर लोक काय करु शकतात. आता येत्या काळात या समितीला बिघर सरकारी संघटना म्हणून स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जाईल.