आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NDA 275, While The UPA 135; In Uttar Pradesh, BJP Has 44 Seats Bhaskar And Divyamarathi Reporters Guess

भास्कर/ दिव्य मराठी प्रतिनिधींचे अंदाज : एनडीएला २७५, तर यूपीएस १३५; ओवेसी-आंबेडकर फॅक्टरमुळे संपुआला महाराष्ट्रात १२ च जागा 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भास्कर/ दिव्य मराठीच्या १० वार्ताहरांनी निवडणुकीदरम्यान देशातील ५४३ पैकी ५३३ जागांचा प्रवास करून मतदारांचा कल जाणून घेतला. ‘भारत यात्रे’वरून परतलेल्या या वार्ताहरांच्या अभ्यासानुसार २३ मे राेजीच्या निकालात रालाेआस ५३३ पैकी २७५, संपुआला १३५ व इतर पक्षांना १२१ जागा मिळू शकतात. तसेच सप-बसप-रालोदच्या महाअाघाडीमुळे भाजपला उत्तर प्रदेशात नुकसान हाेऊ शकते. येथे भाजपला ४४ पर्यंत, तर सप-बसप आघाडीला ३२ व काँग्रेसला ४ जागा मिळू शकतात.  दक्षिण भारतात संपुअाची स्थिती रालाेअापेक्षा अधिक चांगली हाेईल.

 

पूर्व भारत-142 जागा : बिहारमध्ये दुर्बल महाआघाडीचा रालाेआस मिळेल फायदा

रालाेआ    संपुआ    इतर 
65           26        47

 

ओडिशा- ४०, बंगाल- ४२, बिहार- ४०, झारखंड-१४, आसाम- १४, अरुणाचल- २, सिक्कीम- १, मेघालय-२, मिझाेराम-१, मणिपूर-२, त्रिपुरा- २, नागालँड-१

 

प.बंगालमध्ये तृणमूलची स्थिती मजबूत असून आसाममध्ये भाजपला ९ व ओडिशात ७ जागा मिळू शकतात. बिहारमध्ये रालाेआने मोदी फॅक्टरचा चांगला वापर करून घेतला, तर महाअाघाडीस जागावाटपात विलंब केल्याने व ९ नवे चेहरे दिल्याने नुकसान होईल. झारखंडमध्ये महाअाघाडीला फायदा मिळू शकताे.

मिझाेराम, मणिपूर, नागालँडच्या ४ जागा नाहीत.

 

पश्चिम भारत-103 जागा : ओवेसी-आंबेडकर फॅक्टरमुळे संपुआस महाराष्ट्रात १२ च जागा 

रालाेआ    संपुआ    इतर 
76            23       04

महाराष्ट्र- ४८, गुजरात- २६, राजस्थान- २५, गोवा-२, दमण-दीव- १, दादरा-नगर-हवेली- १

 

गुजरातमध्ये विधानसभेत चांगली कामगिरी करूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २ जागाच वाढू शकतात, तर महाराष्ट्रातील मतविभागणीमुळे भाजप-शिवसेना आघाडीस माेठे नुकसान हाेणार आहे. शेतकरी व आदिवासी संघटनांमुळे काँग्रेस निम्म्या जागांवर कडवी लढत देऊनही ओवेसी-आंबेडकर फॅक्टरमुळे १२ जागांवरच गुंडाळली जाईल व भाजप-शिवसेना ३० चा आकडा पार करेल.

 

मध्य भारत-40 जागा : भाजपला छत्तीसगडमध्ये ७, तर एमपीत २३ जागा मिळू शकतात

रालाेआ    संपुआ    इतर 
27           13        00

मध्य प्रदेश- २९, छत्तीसगड- ११

 

> मध्य प्रदेशात भाजपने निम्म्याहून जास्त चेहरे बदलून विधानसभा निवडणुकीतील लाेकांची नाराजी कमी केली आहे. काँग्रेसचे कमलनाथ-ज्योतिरादित्य हे आपापल्या जागेच्या जवळपासच प्रभावी राहिले. राज्यात भाजपला २३ व काँग्रेसला ६ जागा मिळू शकतात. तसेच छत्तीसगडमध्ये भाजपला ७ व काँग्रेसला ४ जागा मिळू शकतात. गतवेळी भाजपला १० जागा मिळाल्या हाेत्या. १० हजार काेटींची कर्जमाफी, वीज बिल माफ आदी योजना भाजपला महागात पडल्या हाेत्या.

 

उत्तर भारत-126 जागा : हिमाचल प्रदेश, दिल्लीच्या सर्व जागा पुन्हा भाजपकडे

रालाेआ   संपुआ    इतर 
63          18        39

 

जम्मू-काश्मीर- ६, पंजाब- १३, हरियाणा- १०, हिमाचल प्रदेश- ४, चंदिगड- १, दिल्ली- ७, उत्तर प्रदेश- ८०, उत्तराखंड- ५

 

हरियाणात जाट विरुद्ध गैरजाट कार्ड खेळले गेले असून केवळ मोदींच्या नावावर मते मागितली गेलीत. पंजाबमध्ये एअर स्ट्राइकचा विपरीत परिणाम दिसत असून मुजाेरीमुळे शिरोमणी अकाली दल बॅकफूटवर गेला आहे. येथे आप कमजोर असून त्याचा फायदा काँग्रेसला होईल. दिल्लीच्या सात व हिमाचल प्रदेशच्या चारही जागा भाजपला मिळू शकतात. 

 

दक्षिण भारत-131 जागा :  दक्षिणेत राहुल फॅक्टर, संपुआस गतवेळेपेक्षा जास्त जागा शक्य

 

रालाेआ    संपुआ    इतर 
44           55        31

 

आंध्र प्रदेश- २५, तेलंगणा- १७, कर्नाटक- २८, तामिळनाडू- ३९, केरळ- २०, पुद्दुचेरी- १, लक्षद्वीप- १, अंदमान-निकोबार- १.

 

तेलंगणामध्ये टीआरएसचा सर्वच जागांवर  काँग्रेसशी मुकाबला आहे. कर्नाटकात लिंगायत व मोदी फॅक्टर आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुकसाेबत भाजपची आघाडी करिश्मा करू शकणार नाही. आंध्रात जगनमोहन यांची लाट असून वायनाडहून राहुल गांधींच्या लढण्याने यूडीएफला फायदा होईल. 

 लक्षद्वीप, अंदमान-निकोबारच्या जागा नाहीत.

बातम्या आणखी आहेत...