आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) एखादा कॅडेट कोणत्याही कारणाने कोर्स पूर्ण करू शकला नाही तर त्याला नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता येईल. त्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा पदवीप्रदान शुक्रवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. श्रीवास्तव बोलत होते. या वेळी कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपिन, डेप्युटी कमांडंट रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागप्रमुख आणि प्रशिक्षक उपस्थित होते. या समारंभात एकूण २८४ कॅडेट्सला आर्ट््स, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, बी-टेक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. श्रीवास्तव म्हणाले की, एनडीएमध्ये कॅडेट्स आल्यानंतर ते खडतर प्रशिक्षणातून यशस्वीपणे कोर्स पूर्ण करतात. त्यानंतर देशसेवेसाठी हवाई दल, नौसेना, वायुदलात सामील होऊन सेवा देतात. मात्र, काही वेळा एखादा कॅडेट प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाही, आरोग्यदृष्ट्या सक्षम नसतो किंवा प्रशिक्षणात गंभीर दुखापत झाल्याने तो प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्याला एनडीए सोडावे लागते. या कारणाने त्याचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळून त्याला शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून पदवीचे शिक्षण पूर्ण करता येण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ असणारी नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी प्रयत्नशील आहे. काही दिवसांत एनडीएसोबत सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रा. श्रीवास्तव यांनी सांगितले. युद्धाचे तंत्र बदलल्याने आता युद्धात शस्त्रांसोबतच ज्ञान आणि बुद्धिमत्ता आवश्यक असल्याचे प्रा. शुक्ला यांनी सांगितले.
२८४ कॅडेट्सना नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीत एकूण २८४ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. यात १३ परदेशी विद्यार्थी आहेत. बीएस्सीचे ४२, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे ८५, आर्ट््स विभागाचे ८४ आणि बी.टेक. विभागाच्या ७३ कॅडेट्सचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.