आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NDA Candidate Harivansh Elected As Deputy Chairman Of RajyaSabha Defeating Hariprasad

एनडीएचे हरिवंश नारायण राज्यसभा उपसभापतिपदी; मोदी म्हणाले, सभागृहावर ‘हरिकृपा’ सुरू राहील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण जेटली आणि गुलाम नबी आझाद हरिवंश यांना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेेले. - Divya Marathi
अरुण जेटली आणि गुलाम नबी आझाद हरिवंश यांना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेेले.

नवी दिल्ली- भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांची गुरुवारी राज्यसभेच्या उपसभापतिपदी निवड झाली. जदयूचे हरिवंश यांना १२५, तर विरोधी पक्षांचे उमेदवार व काँग्रेस खासदार बी.के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. 


एनडीएकडे ८८ खासदार होते. त्यांनी आणखी ३६ खासदारांच्या पाठिंब्यावर १२४ मतांचा दावा केला हाेता. प्रत्यक्षात त्याहून एक मत जास्त मिळाले. यूपीएकडे ४७ खासदार होते. त्यांनी आणखी ६२ खासदारांच्या पाठिंब्यासह एकूण १०९ मतांचा दावा केला होता. मात्र त्यांना चार मते कमीच मिळाली. 


हरिवंश यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता सभागृहावर ‘हरिकृपा’ कायम राहील. सोनिया गांधी म्हणाल्या, आम्ही अनेक वेळा जिंकतो आणि हरतो. या निवडणुकीत एकूण २३० खासदारांनी मतदान केले. विजयासाठी ११६ मतांची गरज होती. अण्णाद्रमुकचे १३ आणि बीजदच्या ९ सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने हरिवंश यांचे पारडे जड झाले.

 

राज्यसभेतील एनडीएचे घटकपक्ष 

पक्ष जागा
भाजप 73
जेडीयू 06
शिवसेना 03
अकाली दल 03
आरपीआय 01
एसडीएफ 01
बोडोलँड फ्रंट

01

एकूण 88 

 

एनडीएला यांचा होता पाठिंबा 

पक्ष जागा
अण्णाद्रमुक 13
बीजद 09
टीआरएस 06

अपक्ष (सुभाष चंद्रा, संजय काकडे,

वीरेंद्र कुमार, अमर सिंह)

04
नियक्त सदस्य 03
आयएनएलडी 01
एकूण 36

यूपीए चे घटकपक्ष 

पक्ष जागा
काँग्रेस  50
राजद  05 
राष्ट्रवादी काँग्रेस 04
केरळ काँग्रेस 01
जेडीएस  01
अाययूएमएल 01
एकूण 62
युपीएला यांचा होता पाठिंबा 
पक्ष जागा
सपा 13
तृणमूल 13
डावे   07
तेदेपा 06
बसपा 04
द्रमुक

04 

एकूण 47
   
यांची भूमिका अस्पष्ट
पक्ष जागा
नियुक्त सदस्य 01
अपक्ष 03
एकूण 04

 

 

बातम्या आणखी आहेत...