आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हेमध्ये एनडीएला बहुमत; भाजपला यूपीत ३० जागांचा फटका, बंगाल-ओडिशात २४ जागांचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडताच रविवारी सायंकाळी सर्व्हे एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केला. देशातील ८ प्रमुख एजन्सींची आकडेवारी खरी ठरली तर या वेळीही एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अर्थात, भाजपच्या जागा २०१४ पेक्षा कमी होऊ शकतात. उत्तर प्रदेशात भाजपला सर्वात मोठा फटका दिसतो आहे. तेथे २०१४ मध्ये मित्रपक्षांसह ७५ जागा जिंकणाऱ्या भाजपला या वेळी सपा-बसपा आघाडीमुळे ४१ जागाच मिळतील. म्हणजे ३० जागांचे नुकसान. भाजप याची भरपाई बंगाल, ओडिशात करताना दिसत आहे. सपा-बसपा मिळून ३४ जागा जिंकू शकतात. 

 

10 राज्यांत 322 जागा : एनडीएने 233 जिंकल्या होत्या, यंदा 218 मिळू शकतात

 

> उत्तरप्रदेश (80)
भाजप+    44
सपा-बसपा    34
काँग्रेस+    2

 

> महाराष्ट्र (48)
भाजप+    35
काँग्रेस+    13
इतर    00


> प. बंगाल (42)
भाजप    16
तृणमूल    24
इतर    2


> बिहार (40)
भाजप+    30
काँग्रेस+    10
इतर    00


> गुजरात (26)
भाजप    24
काँग्रेस    2
इतर    00

 

> मध्यप्रदेश (29)
भाजप    23
काँग्रेस    6
इतर    00


> राजस्थान (25)
भाजप    21
काँग्रेस    4
इतर    00


> ओडिशा (21)
भाजप    11
बिजद    9
काँग्रेस    1


> तामिळनाडू (38)
भाजप+    11
काँग्रेस+    26
इतर    1


> पंजाब (13)
भाजप+    3
काँग्रेस    9
इतर    1

 

केरळमध्ये प्रथमच भाजप खाते उघडण्याची शक्यता

 

> केरळ (20)
काँग्रेस+ 14
डावे+ 5
भाजप+ 1


> आंध्र (25)
वायएसआर  13
टीडीपी  10
इतर  2


> तेलंगणा (17)
काँग्रेस  2
टीआरएस  13
इतर  2


> झारखंड (14)
भाजप  9
काँग्रेस  4
इतर  1


> हरियाणा (10)
भाजप  9
काँग्रेस  1
इतर  0


> दिल्ली (7)
भाजप  6
काँग्रेस  1  
आप  0

 

> इंडिया टुडे-माय अॅक्सिसने आंध्र प्रदेश विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली. तर, आरजी फ्लॅशने नायडूंच्या टीडीपीलाच यश मिळेल, असे म्हटले. 

 

> एक्झिट पोलच्या बातांवर विश्वास नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर, चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात बिगर भाजप सरकारच स्थापन होईल, असा दावा केला. 

 

> तेलंगणात टीआरएसला १३ जागा मिळतील, असे दिसते. परंतु, पक्षाने हा अंदाज फेटाळून २३ मे रोजी निकाल लागल्यावर वेगळेच चित्र दिसेल, असे म्हटले आहे.

 

> लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होतील. तामिळनाडूच्या ३९ पैकी ३८ जागांवर मतदान झाले. वेल्लोरची निवडणूक रद्द झाली आहे.

 

एक्झिट पोलचे सत्य

२०१४ ची लाेकसभा निवडणूक व त्यापूर्वीच्या २२ विधानसभा निवडणुकांत एक्झिट पाेलचे ५८ % अंदाजच खरे ठरले आहेत. सर्वात माेठा उलटफेर बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकीत पाहायला मिळाला.


२००४ लाेकसभा निवडणुकीत एनडीए येईल असे वाटले. मात्र यूपीए सरकार आले हाेते.: तेव्हा एक्झिट पाेलने एनडीएला २५५ जागा दर्शवल्या. मिळाल्या १८७. यूपीएचा २१९ जागांचा अंदाज हाेता, मिळाल्या हाेत्या १८३.

 

२००९ व २०१४ मध्ये  सत्तारूढ पक्षांच्या जागा अनुक्रमे ५४ व ५६ कमी दाखवल्या हाेत्या. : २००९ मध्ये यूपीएला २०८ जागा दाखवल्या, मिळाल्या २६२. २०१४ मध्ये एनडीएला २७८ दाखवल्या, मात्र मिळाल्या ३३६. 

 

बातम्या आणखी आहेत...