आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, तसेच बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबादमध्ये आमचा विजय निश्चित असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ''महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस 13 ते 16 जागांवर विजय मिळवेल. यात बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागांवर विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानाही निकालाचा अंदाज चुकला होता. एक्झिट पोलचा कल खरा ठरला तर, आम्हाला प्रचारात सरकारविरोधी जो राग दिसला तो कुठे गेला? यामुळे ईव्हीएम आणि इतर यंत्रणेवर संशय करायला जागा आहे,'' असेही ते म्हणाले.

 

एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत. पण एक्झिट पोल नेहमीच खरे ठरत नाहीत, एनडीएला 200 च्या वर जागा मिळणार नाहीत. राज्यात राष्ट्रवादीला 13 ते 16 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.


बीडमध्ये धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी स्वतःच्या विश्वासातल्या उमेदवाराला बीडमध्ये उमेदवारी दिली. बीडमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळणार असल्याचा मुंडेंना विश्वास आहे. त्यांनी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. पालकमंत्री मुस्लीम मतदार असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राची माहिती का घेत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी यावेळी केला.