आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडणाऱ्या पुलावर चिमुरड्याला NDRF जवानाने असे वाचवले, व्हायरल झाला Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ इडुक्की - केरळात सलग पावसामुळे पूर आलेला आहे. या ठिकाणी NDRF चे जवान रात्रीचा दिवस करून बचाव कार्य करत आहेत. रेस्क्यूचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात रेस्क्यू ऑफिसर एका बुडणाऱ्या पुलावरून चिमुरड्याला छातीला धरून दुसरीकडे धावताना दिसत आहे. व्हिडिओ केरळच्या इडुक्की जिल्ह्याचा आहे. जेथे शुक्रवारी कन्हैया कुमार नावाच्या NDRF रेस्क्यू अधिकाऱ्याने एका बाळाला पुरात वाहून जाण्यापासून वाचवले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कन्हैयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु कन्हेय्या म्हणाला की- 'मी फक्त माझी ड्यूटी करत होतो.' 

 
पुराच्या पाण्यात बुडत होता पूल
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या बाळाला खूप ताप होता. यामुळे NDRF रेस्क्यू अधिकारी कन्हैया कुमार यांनी आपल्या जिवाची बाजी लावून बाळाला पुलाच्या पलीकडे पोहोचवले. आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. बचाव अधिकाऱ्याने पूल पार केल्याच्या काही मिनिटांनंतर तो पूल पुराच्या पाण्यामध्ये बुडून गेला. त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावरही जबरदस्त प्रतिक्रिया मिळाली असून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 
कौतुक करणाऱ्यांचे कन्हैयाने मारले आभार
बचाव कार्यासाठी इडुक्की जिल्ह्यात तैनात करण्यात आलेले कुमार म्हणाले- 'बाळ खूप आजारी होतो, तेव्हा मला जाणीव झाली की, मी त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊन अॅडमिट करू शकतो. म्हणून मी तसे केले. मला माहिती नव्हते की, या छोट्या कामामुळे लोक मला ओळखू लागतील. ज्यांनी-ज्यांनी या कामाचा सन्मान केला, त्या सर्वांचे मी आभार मानतो.'  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा व्हायरल व्हिडिओ...

 

 

बातम्या आणखी आहेत...