आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदोरी, सायखेड्यात एनडीआरएफ पथक दाखल, पूरस्थितीबाबात नागरिकांना करणार मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर आणि दारणा धरणसमूह तसेच नांदूरमध्यमेश्वरमध्ये मिळणाऱ्या बहुतांश नद्यांवरील धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. पावसाचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे पुराचा तडाखा बसणाऱ्या निफाडमधील चांदोरी, सायखेडा आणि लगतच्या परिसरात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे (एनडीआरएफ) चार अधिकारी आणि २५ जवानांचा समावेश असलेले पथक जिल्ह्यात प्रथमच दाखल झाले आहे. हे पथक पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय कारावे याबाबत 21 ऑगस्टपासून  मार्गदर्शन करणार आहे.


इगतपुरीत एकाचा बुडून मृत्यू 
तालुक्यातील आवळखेड येथील जानू धावू केवारी (५५) यांचा ओहळातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. चिंचलेखैरे शिवारातील पोदली जंगलात गुरे चारण्यासाठी ते गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इगतपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


जिल्ह्यात दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याने नाशिकसह राज्यात मंगळवार आणि बुधवारी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राहुरी कृषी विद्यापीठासह इगतपुरी भात संशोधन केंद्रानेही तसा इशारा दिला आहे. पावसाळा सुरू होऊन ८० दिवस उलटले तरीही आद्याप जोरदार पाऊन न झाल्याने खरिपावर परिणाम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...