आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NDTV Servery On Lok Sabha Elections News In Marathi

SURVEY: \'एनडीए\'ला पहिल्यांदाच बहुमत मिळणार, मोदी वाजपेयींना मागे टाकणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे मिशन 272+ साकार होण्याची शक्यता दिसत आहे. एनडीटीव्हीने केलेल्या एका सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे, की यावेळी एनडीएला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता असून त्यापेक्षा तीन जागा जास्तच मिळतिल. लोकसभा खासदारांचा आपलाच रेकॉर्ड यावेळी भाजप मोडणार असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत भाजपला 226 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. 1991 नंतर कोणत्याही राजकीय पक्षाला मिळालेल्या जागांपेक्षा या जास्त असतील. म्हणजेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एनडीटीव्ही आणि हंसा ग्रुपने केलेल्या या सर्वेक्षणात एकिकडे एनडीएला 230 ते 275 जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे युपीएला केवळ 111 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना 157 जागा मिळतील असे समजते. भाजप स्वबळावर 226 जागा जिंकून दाखवेल तर कॉंग्रेसला केवळ 92 जागांवर समाधान मानावे लागेल. भाजपला 34.5 टक्के तर कॉंग्रेसला 25.6 टक्के मतदान मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपला उत्तर प्रदेशात 50 तर बिहारमध्ये 24 जागा मिळतिल...वाचा पुढील स्लाईडवर