आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉलमध्ये अचानक पोहोचले 'बिग बॉस 13' चे सुमारे 5 हजार समर्थक, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने बंद करावे लागले मॉल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : गुरुवारी मुंबईचा ओबेरॉय मॉल तेव्हा अचानक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जेव्हा अचानक 'बिग बॉस 13' चे सुमारे 5000 पेक्षा जास्त समर्थक तिथे पोहोचल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. सोशल मीडियावर अफवा पसरली होती की, शोचे कन्टेस्टंट्स गोरेगांव येथील मॉलमध्ये वोटिंगचे अपील करण्यासाठी येणार आहेत. मात्र याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. तरीदेखील मॉलमध्ये जमा झाले. जे मॉलच्या अधिकाऱ्यांसाठी त्रासदायक बनले. 
 

गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घ्यावी लागली....  


मॉलचे सुरक्षा रक्षक अचानक आलेल्या गर्दीला सांभाळू शकले नाही. यानंतर जास्तीत जास्त दुकान बंद केले गेले आणि मॉलची इलेक्ट्रिसिटी बंद केली गेली.  मॉलच्या अधिकाऱ्यांनी 'बिग बॉस' च्या समर्थकांना बाहेर जाण्याची अपील केली, पण ते कोणत्याच परिस्थितीत तिथून जायला तयार नव्हते. त्यानंतर ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबईपोलिसांची मदत घेतली गेली आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.

बातम्या आणखी आहेत...