आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निडल फिशचा तरुणावर हल्ला, जबड्याच्या आरपार गेली चोच; तशाच अवस्थेत तरुण पोहचला रुग्णालयात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकास्सर- इंडोनेशियातील दक्षिण पूर्व सुलावेसी प्रांतातील बुटोन गावातील एका तरुणावर निडल फीसने हल्ला केला, यात माशाची चोच तरुणाच्या मानेच्या आरपार घुसली. त्यानंतर हिम्मत न हारता तशाच अवस्थेत रुग्णालय गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन मासा बाजुला काढला.

घटना शनिवारी घडली पण प्रकरण आता समोर आले आहे. 16 वर्षीय मोहम्मद ईदुल शाळेनंतर मित्र सारडीच्या बोटमध्ये बसून मासे पकडण्यासाठी गेला होता. दोघे समुद्रात जाऊन मासे पकडत असताना निडल फिशने त्याच्या मानेवर हल्ला केला. त्यानंतर हिम्मत न हारता मोहम्मदने मासा पकडला आणि त्याला घेऊन थेट हॉस्पीटल गाठले.

मोहम्मदच्या मित्राने बोट वळवली आणि बाऊ बाऊ गावातील हॉस्पीटल गाठले. तिथे सर्जरी करण्याची सुविधा नसल्याने त्याला मकास्सरच्या मोठ्या हॉस्पीटलमध्ये भर्ती केले, तिथे डॉक्टरांनी ऑपरेशन करुन मासा बाहेर काढला. मोहम्मदची तब्येत आता ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितले की, असे प्रकरण याआधी कधीच पाहीले नाही. मोहम्मदचा निडल फीश मानेत अडकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...