आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्यूजन पदार्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राइस टिक्का, डुबकी कढी, राइस पिझ्झा - Divya Marathi
राइस टिक्का, डुबकी कढी, राइस पिझ्झा

नीलम अग्रवाल

भारतातले पारंपरिक पदार्थ वापरून त्याच्यासोबत पाश्चिमात्य पद्धतीचा मेळ घालून एक नवीनच पदार्थ तयार करण्याचा प्रकार रूढ होतो आहे. यालाच फ्यूजन म्हणलं जातं. याच फ्यूजन प्रकारातल्या या काही पाककृती. 
 

राइस टिक्का

  • साहित्य : दोन वाट्या भात अर्थात उकडलेले तांदूळ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, छोटा चमचा बेकिंग सोडा, एक वाटी दही, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, एक मोठा चमचा भाजलेलं डाळीचं पीठ, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा तिखट, छोटा अर्धा चमचा पुदिना पावडर, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर, चार छोटे चमचे लोणी, प्रत्येकी एक कापलेला कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो
  • कृती : भांड्यात उकडलेले तांदूळ,तांदळाचं पीठ, मीठ आणि सोडा एकत्र करा. थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण मळून घ्या. या मिश्रणाचे पनीरसारखे चौकोनी तुकडे करा. दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळा. त्यात थोडं तेल टाकून मिश्रणाचे चौकोनी कापलेले तुकडे मध्यम आचेवर शिजू द्या. ८ ते १० मिनिटांनंतर तुकडे काढून घ्या. त्यातले पाणी निथळून जाण्यासाठी चाळणीवर ठेवा. बाऊलमध्ये पनीरचे तुकडे, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, आणि सर्व मसाले एकत्र करून फ्रिजमध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवा. नंतर त्या तुकड्यांमध्ये एक काडी अडकवून त्या तुकड्यांना लोणी लावून सर्व बाजूंनी भाजून घ्या. पुदिना, कोथिंबीर चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

डुबकी कढी

  • साहित्य : आंबट दही एक वाटी, एक मोठा चमचा बेसन, अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर हिंग, मीठ, मेथीदाणे, चवीनुसार, अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे, कढीपत्त्याची सात ते आठ पानं, फोडणीसाठी दोन चमचे तेल,लाल तिखट एक छोटा चमचा. पकोड्यांसाठी बिनसालीची उडदाची डाळ एक वाटी, ही डाळ तीन ते चार तास भिजवून ठेवावी.
  • कृती : दह्यात बेसन एखत्र करून त्याचं सैलसर मिश्रण तयार करा. कढईत तेल गरम करून मोहरी, मेथी, जिरे, कढीपत्त्याची फोडणी करा. त्यात एक वाटी पाणी टाका. आता हळद पावडर, मीठ, हिंग टाकून त्यात बेसन आणि दह्याचं मिश्रण टाका. या मिश्रणाला उकळी येऊ द्या. गॅस मंद करा. भिजवलेली उडदाची डाळ मिक्समधून घट्ट मिश्रण होईल अशी काढा. यात मीठ, हिंग मिसळून फेटून घ्या. नंतर या मिश्रणाचे वडे करून तळलेले वडे कढीमध्ये टाका. १० ते १५ मिनिटं ते शिजू द्या. तेल, कढीपत्ता, मोहरीची फोडणी करून कढीला वरून फोडणी द्या.

राइस पिझ्झा

  • साहित्य : तांदळाच्या भाकरीसाठी दोन कप तांदळाचं पीठ, अर्धा कप उकडलेले तांदूळ, दोन मोठे चमचे दही, छोटा चमचा सोडा, मीठ चवीनुसार, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बीन्स बारीक चिरलेली प्रत्येकी एक वाटी. दोन छोटे चमचे मक्याचे दाणे, अर्धा कप कापलेलं पनीर, एक छोटा चमचा लोणी, ३-४ क्यूब्स चीज, हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस, ऑरिगेनो, चिली फ्लेक्स चवीनुसार.
  • कृती : भांड्यात तांदळाचं पीठ, उकडलेले तांदूळ, दही, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मिश्रण मळून घ्या. दहा मिनिटं झाकून ठेवा. नॉनस्टिक पॅनमध्ये लोणी वितळवून घ्या. त्यात कापलेल्या सर्व भाज्या टाकून, मीठ आणि थोडा सॉस टाकून मंद आचेवर परतून घ्या. गॅस बंद करा. झाकून ठेवलेल्या मिश्रणाऱ्या गोलाकार पोळ्या लाटून घ्या. या पोळ्यांवर चाकू अथवा काट्या चमच्यानं हलके हलके छिद्र करून घ्या. या पोळ्या तव्यावर लोणी टाकून भाजून घ्या. या पोळीवर सॉस लावून सर्व भाज्या पसरवा. त्यावर चीज किसून पसरवा. यावर एखादं जाड बुडाचं झाकण ठेवून २-३ मिनिटं वाफवून घ्या. त्यावरून ऑरिगेनो, चिली फ्लेक्स, सॉस टाकून सर्व्ह करा.
बातम्या आणखी आहेत...