आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांच्या नीना गुप्ता म्हणाल्या- विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका, त्याचे दुष्परिणाम मी भोगले आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री नीना गुप्ता यांचा सल्ला आहे की, तरुणींनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नये, कारण त्याचे दुष्परिणाम त्यांनी भोगले आहेत. 60 वर्षीय अभिनेत्रीने मुक्तेश्वर (उत्तराखंड)मध्ये एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करुन म्हटले की, कशाप्रकारे विवाहित पुरुष आपल्या पत्नीपासून विभक्त होण्यास नकार देऊन तरुणींना सोडून देतात. 

व्हिडिओमध्ये नीना म्हणतात, "खरं सांगायचं तर, हे काही संवाद आहेत जे तुम्ही बर्‍याचदा ऐकले असतील. त्याने मला सांगितले की त्याला त्याची पत्नी आवडत नाही. बरेच दिवस ते एकत्र नव्हते. मग तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. तो एक विवाहित पुरुष आहे. मग आपण म्हणतो की तुम्ही का विभक्त होत नाही? परंतु तो म्हणतो, नाही, मुले नाहीत. मी असा विचार करु शकत नाही काय होते ते पाहूया, कदाचित एखाद्या दिवशी वेगळे होऊ. मग आपल्या मोठी आशा मिळते. आपण सुरुवातीला कधीकधी भेटता आणि मग आपल्याला त्याच्यासोबत सुट्टीवर जायचे आहे, पण त्याला अडचण असते, कारण काय सांगून जाणार, तर तो खोटे बोलून जातो, मग तुम्ही म्हणता की मला एकत्र रात्र काढायची आहे. आपण त्याच्यावर खूप दबाव आणता तर हॉटेलमध्ये किंवा अशी जागा शोधता जिथे रात्र घालवता येईल. मग तुम्ही पुन्हा एकत्र रात्र घालवता आणि अखेर तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे असते. तुम्ही त्याच्यावर पत्नीला घटस्फोट देण्याचा दबाव टाकता. पण तो म्हणतो, अजून काही वेळ दे, मी त्यावर काम करतोय. हे सोपे नाही. प्रॉपर्टी आहे, बँक खाती आहे... आदि...  आता आपल्याला भीती व निराशा वाटू लागते आणि आपण काय करावे हे समजत नाही? कधीकधी वाटतं की त्याच्या पत्नीला बोलवून तिचा नवरा कसा आहे हे तिला सांगावे. सर्व काही इतके क्लिष्ट आहे. शेवटी तो म्हणतो थांबा, यार, मला अशा प्रकारच्या गुंतागुंतीत अडकायचे नाही. मला नको आहे. मग आपण काय कराल? खरं सांगायचं तर, विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका.  मी हे आधी केले आहे. मी त्याच्या यातना सहन केल्या आहेत. म्हणूनच मी म्हणतेय की तुम्ही प्रयत्न करु नका. "

विवियन रिचर्डबरोबर होते निनाचे संबंध

नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे. मुंबई मिररशी झालेल्या संभाषणात त्या म्हणाल्या होत्या, "जर मला माझी चूक सुधारण्याची संधी मिळाली असती तर मी लग्नाविना आई झाली नसती. प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांची गरज असते. मी मसाबाशी प्रामाणिक होते. यामुळे आमचे नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही." 31 वर्षीय मसाबा एक फॅशन डिझायनर आहे.

'83' मध्ये नीनाची खास भूमिका

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे, नीना अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना स्टारर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये दिसल्या होत्या. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या '83'या सिनेमात त्यांची खास भूमिका आहे. 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित हा चित्रपट 20 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.