आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीच्या पेन्टिंग्नसला लिलावात मिळाले 59 कोटी, 11 महागड्या कारची सुद्धा लागणार बोली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या 68 पेन्टिंग्सचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. त्यामध्ये एकूणच या कलाकृतींना तब्बल 59 कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वात महागडी एक पेन्टिंग राजा रवी वर्मा यांनी बनवलेली होती. त्या एका पेन्टिंगलाच चक्क 14 कोटी रुपये मिळाले आहेत. या व्यतिरिक्त एफएन सूजा यांच्या पेंटिंग्स 90 लाख, जोगेन चौधरी यांची पेन्टिंग 46 लाख, भूपेन खाखर यांची कलाकृती 35 लाख आणि केके हैब्बर यांच्या पेन्टिंगला 40 लाख रुपये एवढी किंमत आली आहे. आयकर विभागाने मुंबईत या लिलावाचे आयोजन केले होते.


आयकर विभागाला नीरव मोदीकडून एकूण 95 कोटी रुपयांची वसूली करायची होती. पेन्टिंग्स व्यतिरिक्त नीरवच्या 11 महागड्या गाड्यांचा देखील लिलाव होणार आहे. सध्या नीरव मोदी लंडनमध्ये आहे. 19 मार्च रोजी त्याला लंडनमध्ये अटक करून कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला 29 मार्च पर्यंत तुरुंगात पाठवले. 


आतापर्यंत 1873.08 कोटींची मालमत्ता अटॅच
पीएनबी बँकेकडून कर्ज घेऊन 13 हजार कोटींचा घोटाळा करून फरार असलेला नीरव मोदी अटकेपूर्वी लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आला होता. ब्रिटनच्या एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अटकेपूर्वी तो लंडनमध्ये आलीशान आयुष्य जगत होता. त्याने लंडनच्या एका पॉश भागात 15 लाख दरमहा भाड्याने घर घेतले. याच ठिकाणी त्याने आपला हिऱ्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू केला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने आतापर्यंत नीरव मोदीची 1,873.08 कोटींची मालमत्ता अटॅच केली आहे.

बातम्या आणखी आहेत...