आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEET 2019; नीट परिक्षेचा निकाल जाहिर, राजस्थानचा नलीन देशात पहिला, तर महाराष्ट्रातून सार्थक भटने मारली बाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 मे रोजी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षा (नीट)चा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहिर करण्यात आला. यंदाच्या निकालात राजस्थानच्या नलिन खंडेलवालने टॉप करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. त्याने 720 पैकी 701 गुण मिळवले. तर दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, आणि उत्तर प्रदेशच्या
अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. 

 

नीटमध्ये महाराष्ट्राच्या सार्थक भटने 720 पैकी 695 गुण मिळवून देशात सहावा येण्याचा मान मिळवला. तर मुलींमध्ये माधुरी रेड्डीने टॉप केले असून तिचा ऑल इंडिया रँक सातवा आहे. माधुरी रेड्डीने 720 मधून 695 गुण मिळवले. दरम्यान, पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला. 

 

दरम्यान, नीटचा सर्व्हर डाऊन असल्याने निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत
नीट परीक्षेयासाठी यंदा देशभरातून 15 लाख 19 हतार 375 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी  7 लाख  97 हजार 42  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आज जाहिर झालेल्या निकालानंतर गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रॅजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन होणार आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी एमसीसीच्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग 2019 ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...