आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित तीन महत्त्वाचे निर्णय सरकारने मंगळवारी घेतले. यात वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित परीक्षांच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले. तर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या गुणवंतांना अार्थिक मदतीचा हातही पुढे केला अाहे.
नीट : वर्षातून एकदाच हाेणार, अाॅनलाइन नव्हे, पूर्वीप्रमाणे लेखी
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा आता वर्षातून एकदाच घेण्यात येईल. तसेच ऑनलाइनऐवजी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच लेखी परीक्षा द्यावी लागेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर ताे मागे घेण्यात अाला.
नीट परीक्षेची तारीख : ५ मे २०१९
परीक्षा दिनांक
नेट : ९ ते २३ डिसेंबरदरम्यान
जेईई मेन्स : २० जानेवारी
जेईई मेन्स : द्वितीय २० एप्रिल
सीएमएटी : २८ जानेवारी
जेईई मेन्स : अाता वर्षातून दाेनदा, ३१ जानेवारी अाणि ३० एप्रिल राेजी
नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई मेन्स परीक्षा अाता एका वर्षातून दाेनदा घेतली जाणार अाहे. या सत्रात ३१ जानेवारी व ३० एप्रिल राेजी परीक्षा हाेणार असल्याचे एनटीएने जाहीर केले. जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेत मात्र काेणताही बदल करण्यात अालेला नाही. साेमवारच्या बैठकीत अालेले बदलाचे प्रस्ताव फेटाळण्यात अाले.
अाॅनलाइन पद्धतीने परीक्षा
सुविधा अशी
> अाॅनलाइन परीक्षा तयारीसाठी २६९७ केंद्रे तयार
> १ सप्टेंबरपासून ही सुविधा मिळेल
> या केंद्रांचे माहिती अॅपही
शिष्यवृत्ती : विदेशात शिक्षणासाठी दरवर्षी २० विद्यार्थ्यांना मिळेल मदत
मुंबई : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी १० खुल्या वर्गातील तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला अाहे. दरवर्षी २० विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल. अाजवर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळत हाेती.
३०% राखीव जागा मुलींसाठी
निकष असे
- खुला प्रवर्ग : उत्पन्न मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत
- इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमातींना नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र सक्तीचे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.