Maharashtra Special / नीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य

त्यांची साईबाबांवर अपार श्रद्धा

प्रतिनिधी

Jul 21,2019 07:44:00 AM IST

शिर्डी- साईबाबांवर अपार श्रद्धा असलेल्या अंबानी उद्योग समूहाच्या नीता अंबानी यांनी साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागास १ कोटी १७ लाख रुपयांचे साहित्य दान स्वरूपात दिले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ४५ लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, ५ लाख रुपयांचे ५५ हँड डिटेक्टर आणि १५ लाख रुपयांच्या ७७ वॉकी टॉकी असे साहित्य खरेदी करून त्यांनी दान केले. या साहित्यापैकी काही येणे बाकी असल्याचे समजते. संस्थानच्या संरक्षण विभागास या साहित्याची आवश्यकता होती. गेल्या काही वर्षांपासून संस्थान या वस्तू भाडेतत्त्वावर वापरत होते. मात्र, आता अंबानींच्या या दानामुळे संस्थानला मोठा फायदा होणार आहे. आयपीएलचा संघ विजेता व्हावा यासाठी नीता अंबानी यांनी यंदाही साईबाबांच्या दरबारात येऊन दर्शन घेत साकडे घातले होते.

X
COMMENT