आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी यांनी सून श्लोकाला सूनमुख पाहण्याच्या कार्यक्रमात दिले सर्वात महागडे गिफ्ट, 20-30 नाही तर काही \'शे\' कोटी आहे त्याची किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचे लग्न हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत 9 मार्चला झाले. अशातच श्लोकाचा सूनमुख पाहण्याचा म्हणजेच मुह दिखाईचा कार्यक्रम झाला. Womanseara च्या रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी सूनेला गिफ्ट म्हणून हिऱ्यांचा हार दिला आहे, ज्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीता यांना आपल्या सूनेला असे काहीतरी गिफ्ट द्यायचे होते, जे खूप खास असेल. खूप वस्तू पाहिल्यानंतर त्यांनी श्लोकासाठी हिऱ्यांचा हा हार पसंत केला. रिपोर्ट्सनुसार, आधी त्या आपल्या कुटुंबातील परंपरागत चालत आलेला सोन्याचा हार देणार होत्या. 

- श्लोकाला जो हार मिळाला आहे, त्याच्यात असलेले हिरे जगातील सर्वात महागडे हिरे आहेत. त्याच्या डिजाइन आणि बनावटीमुळे या 'L'Incomparable नेकलेसची किंमत 300 कोटी रुपये आहे. नीता यांच्याव्यतिरिक्त श्लोकाची नणंद ईशा अंबानीनेही भाऊ आणि वहिनीला एक आलीशान बंगला गिफ्टमध्ये दिला आहे. 

तीन दिवस सुरु होते वेडिंग फंक्शन... 
आकाश-श्लोकाच्या ग्रँड वेडिंगचे फंक्शन 3 दिवस चालले होते. यामध्ये बॉलिवूड सेलेब्ससोबतच देश विदेशातील गेस्ट सामील झाले होते. बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, सलमान खान, शाहरुख खान, करीना कपूर, आमिर खान, रेखा, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, कियारा आडवाणी, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, जाह्नवी कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह यांच्यासह अनेक सेलेब्स सामील झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...